रामपूर नगर सावरगाव गोरे येथे 27 ऑगस्ट रोजी आरोपी दिलीप राठोड यांनी प्रदीप जाधव यांच्या घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने प्रदीप जाधव यांनी हटकले असता दिलीप राठोड यांनी वाद घालत लोखंडी रॉडने प्रदीप जाधव आणि त्यांची पत्नीला मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.