पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परसराम धानूजी कुमरे (वय ४८, रा. जपतलाई, ता. धानोरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला जन्मठेपेसह ५,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल, असाही निकाल न्यायालयाने दिला आहे.