खेड तालुक्यातील कडूस येथून अडीच वर्षांपूर्वी प्रवीण ऊर्फ नागेश मधुकर टोके (वय ४३) या मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून त्याला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे एका व्यक्तीकडे सोडण्यात आले होते.या प्रकरणी बंडू सहादू साळुंके (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड), सचिन रघुनाथ चव्हाण आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.