देवरी शहरासह तालुक्यात आज सकाळी सहा वाजता सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला अचानक आलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले पावसाळा सुरू असण्याचा शेवटचा महिना आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तालुक्यातील अनेक नदी नाले व ओसंडून वाहू लागले आहेत त्यातच गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर मोठा होता ओढे नाले भरून वाहू लागले तसेच अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने पाहायला मिळाले