मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. या यशानंतर हिंगोलीत आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा समाज बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मराठा समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे. त्याचबरोबर डफाच्या तालावर नाचून आनंद साजरा केला