सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील बायपास रोडवरील लाईटच्या डीपीच्या शेजारी पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी देशी दारू संत्रा कंपनीच्या बाटल्या जप्त केल्या. चोरून दारूची विक्री करणारा मल्हारी महादेव चव्हाण वय वर्षे 45 राहणार चिणके तालुका सांगोला याच्यावर सांगोला पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भोसले यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदरची कारवाई ही 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.