गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ऋषीपंचमीच्या पवित्र पर्वावर जळगाव तालुक्यातील कानळदा येथील महर्षी कन्वआश्रम येथे गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भाविकांनी, विशेषतः महिलांनी, मोठ्या उत्साहात दर्शन आणि स्नानाचा लाभ घेतला. सकाळपासूनच गिरणा नदीच्या काठी महिलांचा मोठा जनसागर लोटला होता. परंपरेनुसार, महिलांनी नदीत पवित्र स्नान करून शंकरपूजन केले आणि ऋषींच्या स्मृतींना अभिवादन केले.