कळमनुरी शहरासह तालुक्यात पोत्रा ,येहळेगाव गवळी,सापळी,जांब,सिंदगी,बेलमंडळ,वडगाव रेडगाव,यासह बहुतांश गावात आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.अनेक गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने बैलजोळ्यांचे मंगलाष्टके गाऊन लग्न लावून सण साजरा केला आहे .शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीचे पूजन करून मोठ्या थाटात हा सण गावोगावी साजरा करण्यात आला आहे .