कुंभारवाडा परिसरात ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेजाऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घराजवळ येऊन शिवीगाळ करत वाद घातला. या वादात भाजी कापण्याच्या चाकूने शेजाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. फिर्यादी राहुल हरिदास बरडे यांची पत्नी घरी असताना आरोपी बाळू पवार (रा. कुंभारवाडा) हा दारू पिऊन घराजवळ येऊन शिवीगाळ करीत होता. पत्नीने फोनवरून पतीला कळविल्यानंतर राहुल बरडे तातडीने घरी आले. त्यांनी शिवीगाळ का करतोस असे विचारताच आरोपीने भाजी कापण्याचा चाकू घेऊन त्यांच्या छातीवर वार केला. यात गंभीर