दारव्हा शहरातील श्री शिवम विजय पाले यांच्या शिवकृपा ज्वेलरी दुकानांमध्ये एका अनोळखी बुरखा घातलेल्या महिलेने 60 हजार रुपये किमतीचे सोने चोरी करून नेल्याची घटना घडली होती.स्थानिक गुन्हे शाखेने त्या अज्ञात महिलेच्या शोध घेऊन अकोला जिल्ह्यातून ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.