सिंदी विशाल विविध कार्यकारी सोसायटीची ७६ वी वार्षिक आमसभा ता. २८ सप्टेंबर रविवारला दुपारी १२.३० वाजता सिंदी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकबाबू कलोडे होते. या वेळी संस्थेला अनामत रक्कम देऊन सहकार्य करणारे महेश देशपांडे, सुरेश इरवार, शशीकलाबाई इरवार, निखील ठाकरे, रामा सोनटक्के, मुरलीधर कलोडे, अशोक चिं. कलोडे व विजयभाऊ कायले यांचा संस्थे तर्फे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.