मातंग समाज समिती तिरोडा तालुका व समाजबांधवाच्या वतीने दिनांक २१ ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी सभागृह तिरोडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड मॅडम, तिरोडाचे पोलीस निरीक्षक श्री अमित वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्रजी रहांगडाले, अशोकजी असाटी, आदी मान्यवर उपस्थित होते.