पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या एका विवाहीत महिलेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शेटफळ, ता. मोहोळ येथे सोमवार ता. 25 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहिणी निवृत्ती चव्हाण (वय-30 रा. शेटफळ. ता मोहोळ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या बाबतची खबर विजय धनाजी जाधव याने मोहोळ पोलिसांत दिली आहे. मोहोळ पोलीसाकडुन मिळालेली माहिती अशी की, विजय धनाजी जाधव हे शेटफळ येथील जाधव वस्ती येथे सहकुटुंब राहतात.