काशिमीरा पोलिसांनी टारझन ऑर्केस्ट्रा बारवर काल रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे या कारवाईत 5 मुली या चक्क एका कपाटात सापडल्या. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 21 जणांना अटक केली आहे. यामध्ये 12 मुलींची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 5 मुली या बारामधील कपाटात लपवल्या होत्या.