बुट्टीबोरी येथून दुचाकीने येत असलेले दोघेजण रोडलगत उभ्या असलेल्या आयसर ट्रकला धडकल्याने दुचाकीवरील 1 जण गतप्राण झाला तर 1 गंभीर जखमी झाला. ही घटना ता. 31 मे शनिवारी रात्री 8 वाजताचे दरम्यान वर्धा- नागपूर महामार्गावर केळझर शिवारात दफ्तरी पेट्रोल पंपा जवळ घडली. मुन्ना उर्फ अभय हरीचंद्र शंभरकर वय 45 रा. सेलू असे मृतकाचे नाव आहे. तर प्रफुल सुरेश खांडेकर वय 40 वर्ष रा. सेलू असे जखमीचे नाव आहे. जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.