आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून आजपासून त्यांनी कठोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान आज जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.