दोन दिवसापासून घरून लापता असलेल्या किरण गोरे वय 45 राहणार आर्वी या महिलेचा मृतदेह पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर दोन दिवसानंतर आज चार ते पाच वाजता च्या दरम्यान हाती लागला.. गुरुवारी तारीख चार ला रात्रीच्या सुमारास स्टेटस वर आत्महत्या करीत असल्याचा संदेश टाकला होता आणि ऍक्टिवाने घरून निघून गेली होती.. या घटनेची माहिती शुक्रवारी पोलिसांना देण्यात आली.. तेव्हापासून पोलिसांनी एनडीआर पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला होता..