महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटीची मदत करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.