भिल्ल समाजाचा थेट पंचायत समितीवर मोर्चा संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील भिल्ल आदिवासी समाज बांधवांनी अपुरे राहिलेले घरकुल पूर्ण करावेत तसेच घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता पंचायत समितीवर मोर्चा काढला. हा मोर्चा आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी व नान्नजचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज सत्तर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. गावातील अनेक महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.