बार्शी टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने अनुभवासाठी ठेकेदारास तुमच्याबरोबर काम करावयाचे आहे, असे विचारताच भागीदारीत काम करण्यास १० लाख रुपये घेऊन २० लाख रुपये देईन, असे आमिष दाखविले. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंजली किरण काकडे (वय २८, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांच्या फिर्यादीवरून तेजस दत्तात्रय पाटील (रा. गादेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.