पुळकोटी येथे शुक्रवारी दुपारी दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करून दरोडेखोरांनी महिलेला ठार मारले.सौ. सुलभा मारुती गलांडे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे.घटनेच्या वेळी मारुती गलांडे हे म्हसवड येथे कामानिमित्त गेले होते. ते सायंकाळी पाच वाजता घरी आले, तेव्हा त्यांना ही बाब समजली.