गत दहा दिवसा पासून घराघरात स्थापना झालेल्या गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले जात असून शनिवारी 12 वाजेपासून गोदावरी नदीपात्रात चोपडा लॉन्स पुलाजवळ सुविचार मंच आयोजित देव द्या देवपण घ्या अभियान राबविण्यात येत असून संस्थापक आकाश पगार यांचे मार्गदर्शना खाली मुर्ती संकलन उपक्रमास गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.