महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या तीन दिवसीय दौऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. समिती प्रमुख आमदार सुहास कांदे व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात व्ही जे एन टी समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या २५ विशेष शिबिरांमधून वंचित नागरिकांना विविध मूलभूत सेवा उपलब्ध करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुकाचा ठराव मांडला.