सोलापूर साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजता श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सरकारकडे मागणी केली की, “जगण्यासाठी आम्हाला किमान १ टॉप १ बेसची परवानगी द्यावी.” त्यांनी स्पष्ट केले की, साऊंड व्यवसायावर आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचे उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने नियमांमध्ये शिथिलता देऊन व्यवसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.