आपण नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी मागण्यांसाठी उभा राहिलो. लोकसभेतही आपण धनगड - धनगर या मुद्द्यावर आवाज उठविला होता. धनगर समाजातील बराचसा वर्ग आर्थिक अडचणीत असून त्यांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका असल्याचे माढा मतदार संघातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. सोमवार दि. १६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उपोषण सुरु असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला.