आई व भावासोबत असलेला वाद मिटविण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्या प्रकरणी मिरजेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पदाधिकारी अभिजित हारगे व आकाश कांबळे यां दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यां घटनेमुळे मिरजेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मिरजेतील महिला बारामती, जि. पुणे येथे सासरी राहते. दि. 18 जून रोजी रात्री 12.30 वाजता मिरजेत