आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथील कार्यालयात 'जनता संवाद'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी मांडलेल्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित मागण्या जाणून घेत, योग्य ती कार्यवाही करत निराकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी काही समस्यांचे तात्काळ समाधान करण्यात आले, तर इतर तक्रारींसंदर्भात संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.