चामोर्शी – तालुक्यातील आलापल्ली वनविभागातील वनपरिक्षेत्र घोट उपक्षेत्र देवदा नियतक्षेत्र देवदा 2 मधील राखीव जंगलातील अवैध सागवन तोड करून तस्करी करणाऱ्या 1) विपिन विमल विश्वास रा. गौरीपुर२) राकेश गिरमा तिम्मा रा.रेगडी यांना यापूर्वी अटक करण्यात आले होतेव सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून तिसरा आरोपी आशिष हिरेन गाईन रा. श्रिनिवासपुर यांना अटक करण्यात आले आहे आणि त्यांना न्यायालय, चामोर्शी येथे हजर करण्यात येत असल्याचे माहीती देण्यात आली. त्यामुळे अवैध सागवन तस्करांचे धाबे दणाणले आहे.