राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने ७० वर्षांपासून देशातील मुस्लिम समाज बांधवांचा मतदानासाठी फुकट वापर करून घेतला,भारतीय जनता पक्षाची मुस्लिम समाजाला भीती दाखवली गेली,आजही एक आमदार मुस्लिम समाजा बद्दल बेताल व्यक्तव्य करीत आहेत तरी उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी त्या आमदारांचा साधा उदगीर मतदार संघात निषेध केला नाही, आजपर्यंत राष्ट्रवादी व काँग्रेसने मुस्लिम समाजाचा फक्त भीती दाखवून वापर करून घेतला असा घणाघात एमआयएमचे ताहेर हुसेन यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षावर केलाय