कळमनुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी जेष्ठा गौरी पूजन म्हणजे श्री महालक्ष्मी हा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .दिनांक 31 ऑगस्ट रोजी ज्येष्ठा गौरी आवाहना नंतर आज दि .1 सप्टेंबर रोजी सोमवारला पारंपारिक पद्धतीने ज्येष्ठा गौरीची स्थापना करून सायंकाळी ज्येष्ठा गौरी पूजन करण्यात आले आहे .