जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव शहरातील बाजार समिती परिसरातून आज दुपारी बाराच्या सुमारास रन फॉर आदिवासी मॅरेथॉन या स्पर्धेची सुरुवात झाली. आमदार आमशा पाडवी हे या स्पर्धेला उपस्थित होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातून खेळाडूंचा समावेश होता.