पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. हा टप्पा सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला ९० दशलक्ष प्रवासी हाताळू शकेल. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.