बिद्री साखर कारखान्याकडे ज्यांची तज्ञ संचालक म्हणून निवड झाली ते नूतन संचालक जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांचा गारगोटी येथील खासदार शाहू महाराज संपर्क कार्यालय महाविकास आघाडीच्या वतीने आज 25 रोजी सकाळी 10 वाजता भव्य असा सत्कार करण्यात आला. मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढीसाठी जिवन पाटील यांनी प्रयत्न केले आहेत . माजी पालकमंत्री व काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहेत. याप्रसंगी जिवन पाटील सर्वांचे आभार व्यक्त केले.