खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर आज बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या मोटरसायकल अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. भरणे गोवळवाडी येथील कोल्हापूर गॅरेजसमोर हा अपघात घडला. मुंबई गोवा महामार्गावरील कळंबनी येथून खेडच्या दिशेने येत असलेली MH 03 BS 3742 ही मोटरसायकल वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि मोटरसायकल रस्त्यावर घसरली. या अपघातात मोटरसायकलवरील दोन्ही युवक जखमी झाले. जखमींमध्ये सुमित चंद्रकांत मोरे आणि कार्तिक अरुण मोरे यांचा समावेश आहे