दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता राधिका रोड येथे जयवंत पवार यांच्या देशी दारुच्या दुकानाच्या समोर किस्मत ज्योतिराम भोसले वय ४५, रा. शेतकरी मंडई यास बाळा नावाच्या व्यक्तीने लहान मुलीला का घेवून आला असे विचारत किस्मतला लाकडी दांडक्याने कमरेवर आणि उजव्या पायाच्या नडगीवर मारुन फॅक्चर करुन जखमी केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून याचा गुन्हा दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल केला.