दिग्रस तालुक्यातील नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय विश्रामगृह दिग्रस येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान नागरिकांच्या तक्रारी प्रशासनासमोर मांडून त्यांची तात्काळ सुनावणी करण्यात आली व त्यावर तत्पर तोडगा काढत नागरिकांचे समाधान करण्यात आले. तसेच प्रलंबित असलेल्या इतर ९३७ तक्रारी येत्या १५ दिवसात निकाली काढाव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.