मलकापूर शहरातील गोकुळ धाम येथून 30 वर्षीय युवक 8 सप्टेंबर रोजी हरविल्याची नोंद 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.मलकापूर शहरातील गोकुळ धाम येथून प्रसाद जितेंद्र कापसे हा 30 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.