तळेगाव, ता. चाळीसगाव: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज, शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी तळेगाव येथे शांततापूर्ण कामबंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबईतील आंदोलनात सहभागी होणे शक्य नसलेल्या ग्रामस्थांनी गावातच दुपारी १ ते ३ या वेळेत एकत्र येऊन सरकारच्या धोरणांचा निषेध केला. गावकऱ्यांनी गावातील मुख्य रस्त्यावर एकत्र येऊन 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा दिल्या.