वाहन उद्योगासाठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. देशातील पहिली टेस्ला कार महाराष्ट्रात दाखल झाली असून, राज्याचे परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडचे आ. प्रताप सरनाईक यांनी स्वतः ही कार खरेदी केली आहे. याबाबत त्यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास माहिती दिली. महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रोत्साहन दिले जात असताना ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.