फिर्यादी शिवदास नारायण मेश्राम यांच्या तक्रारीनुसार 24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश करून स्वयंपाक खोलीत ठेवलेल्या जर्मन डब्यातील नगदी 65 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी 25 ऑगस्ट ला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.