मेहगावच्या भूमीतील सुपुत्र पांडुरंग नागरे यांच्या देशसेवेच्या यशस्वी सेवा पूर्तीनिमित्त भव्य सोहळा आज दि चार स्पटेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पार पडला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे व आमदार संजना जाधव उपस्थित राहून नागरे यांचा सत्कार केला.दीर्घकाळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने दिलेल्या सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.