कुर्डूचे माजी सरपंच यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे सोळा ते सतरा खून केले असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अकलूजचा आक्का कोण आहे? याची चौकशी करावी. अकलूज येथे जी खुनाची मालिका झाली. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांवर वेगवेगळे आरोप केले आहेत. ते आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी अकरा वाजता पत्रकारांशी बोलत होते.