गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोराळे गावातील शिवशक्ती गणेश मंडळाने एक आदर्श घालून दिला आहे. मंडळाने 'डीजे मुक्ती'चा संकल्प करत त्या खर्चातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी ६ सप्टेंबर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास माध्यमांना दिली आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला असून, सामाजिक भान जपणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.