रामनगर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान संशयित तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.२१) रात्री शक्ती चौक परिसरात रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गावर करण्यात आली. पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना शक्ती चौक परिसरात रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गावर एक तरुण संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला. पथकाने त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने सौम्य मनोज छितरका (२४, रा. इंदिरा गांधी स्टेडीयम जवळ)