मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अहमदपुरात मराठा समाजाचा जल्लोष मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झालमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे अहमदपूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.