राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समिती व एकता संघ एन एच एम संघटना गोंदिया द्वारा नियमित शासन समायोजन,विनंतीनुसार बदली धोरण अशा विविध मागण्या संदर्भात जिल्हा परिषद गोंदिया येथे दिनांक 19 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे तसेच माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी दिनांक 28 ऑगस्ट ला दुपारी तीन वाजता दरम्यान भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या.