आज शनिवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आयआयटी, पवई येथे माजी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा वॉर्ड क्रमांक १२२ च्या वतीने आयोजित गणेश विसर्जन कार्यक्रमात माजी खासदार मनोज कोटक यांनी सहभागी होऊन गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी गणेश विसर्जनासाठी प्रवास करणाऱ्या भक्तांना भाजपाच्या वतीने बिस्कीट व सरबताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, संजय शर्मा, भास्कर दुबे, रामसुरत सिंह, लाल यादव, विलास सोहनी उपस्थित होते.