भूम तालुक्यातील घाटनांदुर येथे पवनचक्की कंपनीच्या विरोधात तक्रार दिली म्हणून शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बजरंग कोळेकर या शेतकऱ्याला मारहाण झाली आहे या अगोदरही पवनचक्की कामाच्या तक्रारी त्यांनी दिल्या होत्या त्यावेळी त्यांना बघून घेतो अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. अशी माहिती माध्यमांशी बोलताना सात सप्टेंबर रोजी साडेदहा वाजता मारहाण झालेल्या शेतकऱ्याने दिली आहे.