भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्या चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.