सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील, बाळू पाटलाची वाडी या छोट्याशा गावातील, शितल व संभाजी मिसाळ या मागासवर्गीय कुटुंबीयांनी, पुणे पंढरपूर पालखी मार्गालगत श्री क्षेत्र पाडेगाव टेकडी येथे, सन 1990 सालापासून वसाड व उड्या अशा निर्जन माळ रानावर दोन किलोमीटर वरून पाणी आणून, मोठ्या संघर्षणातून या ठिकाणी वनराई फुलवून, निसर्ग व पर्यावरणास हितकारक असे कार्य केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेत, या दापात्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली.